दि. १५ डिसेंबर २०१२ रोज शुभारंभ झालेल्या नॅब भवनातील बाई रतन बाई घरडा अंध पुनर्वसन केंद्राने घेतलेली भरारी......
सन २०२०-२१ व २१-२२ या वर्षातील कार्य
१. नॅब इंडीया मुंबईच्या सहकार्यातुन गतवर्षी करोना महामारीत १३५ किराणा किट अंधव्यक्तिना त्यांच्या घरी जावून वाटप केलेले आहे.
२. २२ ते २३ जुलै २०२१ च्या महापुरानंतर ३१ शिबीरे घेण्यात येवून त्यामध्ये मोफत औषधोउपचार पुरविण्यात आले.
३. बेस्ट बॅकबे आगार मुंबई/सहस्त्रधार फाऊंडेशन मुलुंड यांच्या सहकार्याने पुरग्रस्त भागात किराणा किट वाटप करण्यात आले.
४. मेजर कलेक्शन चिपळूण यांचे सहकार्यातुन पुरग्रस्त भागात तसेच अंध व्यक्तिंना कपडे वाटप करण्यात आले.
स्वयंरोजगार
१. श्री. संजय माटल रा. कुडली गुहागर — जनरल स्टोअर्स, पिठाची चक्की
२. अंधाचा रत्नागिरी जिल्हयातील बचतगट सद्गुरू कृपा सहायक समुह कोसबी हा एक नानिण्यपुर्ण कल्पनेने सावारलेला बचत गट आहे. ७ अंधानी स्थापन केलेला बचत गटामध्ये कुकुटपालन/दुग्धव्यवसाय/पिठाची गिरणी/पोळीभाजी /चहा नाष्टा सेंटर च्या माध्यमातून व्यवसाय निर्मीती
३. श्री. आनंद मेस्त्री काजुर्ली गुहागर - गणपती कारखाना, पिठाची चक्की, गॅस एजस्नी
४. श्री. शषिकांत लटके रा. पाग चिपळूण - भागिर्थी जनरल स्टोअर्स, पिठाची चक्की
५. श्री. संतोष मुरूडकर रा. पणदेरी मंडणगड - जनरल स्टोअर्स, पिठाची चक्की
६. श्री. बाळू मोहिते रा. अंत्रवली, संगमेष्वर - मसाज
७. श्री. सागर विचारे रा. फणसवणे संगमेष्वर - फिरते विक्रेते (अगरबत्ती व्यवसाय)
८. श्री. संजय सार्दळ रा. लोवले संगमेष्वर - एजन्सी संगमेष्वर शहर (छोटया दुकानांना वस्तु पुरवितात)
९. श्री. राकेष चाळके रा. लोटे खेड -नोकरी मसाजिस्ट (परषुराम हॉस्पिटल लोटे)
१०. श्री. उदय खळे रा. परषुराम खेड - जनरल स्टोअर्स, मंडप डेकोरेटर्स व्यवसाय
११. श्री. संतोष भेकरे रा. पणरेदी दापोली - दुकान, पिठाची चक्की
१२. श्री. नंदकुमार षिंदे रा. नांदीवसे चिपळूण - भाजीपाला विक्री व्यवसाय
१३. सन २०१२ पासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक़ अंतर्गत सी.जी.एच. सी.३२ स्वयंप्रेरक प्रेरिका अभ्यासक्रमामध्ये अंध बांधव व भगिनींचा समावेश.
१४. दि. ३०.११.२०१३ रोजी काॅम्प्युटर सेंटर सुरू करण्यात आलेले असून त्यामध्ये अंध बांधवाना बेसीक संगणकाचे प्रशिक्षण दिले जाते.
१५. दिवाळी तसेच पारंपारिक सण उत्सवा निमीत्त अंध बांधव भगिनींनी आयुर्वेदीक सुगंधी उटणे / अत्तर/ फेसपॅक / अगरबत्ती बनविली व त्यांची विक्री केली.